चोरी, घरफोडी करणारे तीन गुन्हेगार जाळ्यात

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) घरफोडी, चोरी आणि लूटमारीसारखे गुन्हे नोंद असलेल्या तीन सराईत गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार घरफोडी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्या ताब्यातून दुचाकीसह १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख आदिल शेख जावेद (रा. शंभूनगर), फरार तडीपार आरोपी आमिर आयुब शेख (रा. इंदिरानगर), शेख रिझवान शेख रहेमान (रा. शंभूनगर), जाहेद बागवान (रा. शंभूनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
खिंवसरा पार्क येथील सेवानिवृत्त कर्मचारी सुनील कांत यांचे घर फोडून ७ ऑगस्टला मध्यरात्री चोरट्यांनी चोरी केली होती. जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. बीट मार्शल मारोती गोरे यांनी गुप्त माहिती, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि सायबर सेलच्या तांत्रिक मदतीवरून
११ ऑगस्टला त्रिशरण चौकातून संशयित आरोपी शेख आदिल शेख जावेद याला ताब्यात घेतले. चौकशीत आदिलने साथीदार अरफात शेख आणि जाहेद बागवान यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अरफात शेख याला करून अटक दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळवली. उल्कानगरीतील कृषी विभाग कार्यालयातून १५ हजारांची इनव्हर्टर बॅटरी चोरल्याचे मान्य केले. या गुन्ह्यात अर्जुन केशरसिंग राजपूत याचाही
सहभाग असल्याचे समोर आले आहे. सातारा हद्दीतील रेल्वे रुळाजवळ तांब्या-पितळेची भांडी चोरी करणे आणि पुंडलिकनगर हद्दीतील राजेशनगर, बायपास येथे घरफोडी केल्याची कबुली आरोपींनी दिली. ही कारवाई पोलिस उपनिरिक्षक रावसाहेब वाघ, अनिल भाले, मारोती गोरे, राजू शिंदे यांनी केली.
आरोपी सराईत गुन्हेगार
शेख आदिल याच्यावर चोरी, घरफोडी, लूटमारीचे पाच पेक्षा जास्त गुन्हे आहेत. फरार तडीपार आरोपी आमिर आयुब शेखवर घरफोडीसह लूटमारीचे १० पेक्षा जास्त गुन्हे तर शेख रिझवान याच्यावरही गंभीर गुन्हे असून जाहेद बागवान याच्यावर दोन गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions